
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोससोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..
मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
पाणावलेल्या कडा म्हणतातविसरु नकोस मला,
ओठांवरच स्मित म्हणतआठ्वेलच मी तुला!!
सुकलेली पाने गळतात नावारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्न पडतातमी डोळे मिटल्यावर
जे स्वप्न कदीही सत्य होनार नाहीते स्वप्न बघत आहे मी
तु ज्या रस्त्या वरुन जात नाही
त्या रस्त्यावर तुज़ी वाट बघत आहे मी
जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!
No comments:
Post a Comment