Tuesday, April 8, 2025

मनातील भावना

 आज ५ वर्ष झाले १ जूलै २०१५ रोजी तुझे माझ्या पोटी आगमन झाले आणि तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला... जसा एका झाडाला बहर येतो तसा माझ्या जिवनाला तुझ्या येण्याने बहर येऊन एक प्रकारची सुंदर पालवी फुटली.... तुझे ते निरागस रूप मनाला उभारी देत होते... तुझा तो पहिला स्पर्ष असा होता की माझ्या मातृ ह्रदयात मायेचा अथांग सागर निर्माण झाला होता.... जसा जसा तु मोठा होत होता तसे तुझ्या बाललीला मी मनात साठवून ठेवत होते... तुझे ते अल्लड भाव,बोबडे बोलणे ,निखळ हास्य सर्व प्रकारच्या चिंता दूर करून देत असत.... आज तु ५ वर्षांचा झालास पण असे वाटते की काल तर एवढा छोटुला होता ! कमलेश तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद😊😘😘😘🎉❤️❤️❤️

 तुझ्या वाढदिवसाला तुझ्यासाठी एक कविता करतेय ...


     

   प्राजक्त हा बहरला जेव्हा तु उमलून आला , मातृत्वास पुर्णत्व प्राप्त झाले तया जिवन सार्थकी झाले...


गेले विसरुनी यातना झाल्या होत्या तु येताना, हास्य तुझे पाहोनी तृप्त झाल्या भावना...


कृतार्थ जाहले मन तव येण्याने परी का शोधू आणिक आनंदाला, अथांग सागर आनंदाचा आम्हास लाभला...


लाभावी तव विश्वव्यापुनी आरोग्य,चातुर्य, तेजस्विता आणि बुद्धीसंपदा ..

  कृपा असावी सदैव सद्गुरुंची हाच आशिर्वाद मागोनी, सोबती असावी भाग्यदा... 🙏🙏🙏🌸🌸💐💐

1st birthday my son

 पहिल्यांदा तुझ्या मधुर आवाजाने जेव्हा सर्व हॉस्पिटल दुमदुमून निघाले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही... जेव्हा मॅडम सांगायला आल्या , " तुला मुलगा झाला आहे!" तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रूंनी माझ्या बाळाला बघण्यासाठी लगबगीने बाहेर धाव घेतली... मग त्या म्हणे ," तुला मुलगी झाली नाही म्हणून रडतेय का?" मी म्हणलं नाही हो मॅडम माझे दुसरे बाळ मी बघतेय म्हणून आनंद झाला ... आत्ताच गुरूपौर्णिमा होऊन गेली, तर मी आज गुरू निष्ठा आणि सद्गुरुंची कृपा असेल तर काहीही होऊ शकते हे सांगते जे मी अनुभवले... जेव्हा कळलं की मी आई होणार तेव्हा मॅडमनी सांगितले की तब्येत वीक असल्यामुळे तुला बेडरेस्ट लागेल... मग काय, 9 महिने मी एकाच रूम मध्ये सरळ झोपलेल्या अवस्थेत...पहिले 4 महिने फक्त झोपायचं आणि जेवण करण्यासाठी उठायचे असे सांगितले होते मग बाकीचे 5 महिने माझ्या माहेरी गेली... aai आणि वडिलांनी जिवापाड जपले... माझ्याकडे आणि कमलेश कडे खूप लक्ष द्यावे लागत ... थोडा वेळ घरातच फिरायचे... प्रत्येक weekend ला injection होते... पण गुरूंचे आणि माझ्या इष्ट देवतेचे स्मरण केले की सर्व काही ठीक होत होते..29 जून रोजीऔरंगाबाद la आलो...आणि 25 जुलै सकाळ झाली 6.40 वाजले माझ्या पोटात कळा सुरू झाल्या... मग काय लगेच घाई सुरू केली की hospital मध्ये जाव लागेल... आई आणि वडील, माझा नवरा आणि मुलगा सर्वजण tension मध्ये....

         Hospital गाठले तेव्हा 10.30 am झाले होते, अख्खा दिवस गेला मग संध्याकाळ झाली...6.15 pm ला मला labor रूम मध्ये नेले... ते hospital माझ्या साठी नवीन होते कारण माझी treatment ही Corona काळ असल्याने 2 ते 3 hospital मध्ये सुरू होती... म्हणून पहिल्यांदा 23 जुलै रोजी मी या hospital मध्ये आले होते... 

         जोरात कळ आली होती मग सर्व रूम मध्ये dr. आणि sisters धावपळ करत होत्या... मॅडम कोण हे पण मला माहिती नव्हते पण माझ्या गुरूंनी सांगितले होते की delivery औरंगाबादला करायची आहे आणि तेव्हा मनात निश्चित केले होते की काहीही संकट आले तरी आपली गुरू निष्ठा कमी नाही होऊ द्यायची... delivery झाली पण टाके बसत नव्हते..सारखे तुटत होते आणि तेव्हढे bleeding खूप होत होते... ते hospital येशू ख्रिस्तचे 🙏 माझ्या टेबल च्या बाजूला भिंतीवर त्यांची मूर्ती ठेवलेली होती...छोटेसे मंदिर केल्यासारखे... मी त्यांच्या कडे बघीतले मला तेथे माझे सद्गुरु दिसत होते... मॅडम म्हणाल्या की," मला आता काहीही कळत नाहिये काय करू अग..तुला टाके बसत नाहियेत!! "; तेव्हा मी वर बघितले माझ्या गुरूंना आवाज दिला की या मॅडम la काहीही येत नाही आता तुम्ही काही तरी करू शकता... सारखे स्मरण करत होते...मग मॅडम मला म्हणे आपण आमच्या मोठ्या मॅडम la बोलावून बघू त्या आल्या तर आल्या नाहीतर आपल्या हातात काही नाही राहणार... तेव्हा मनात आले अग बाई तू call कर त्यांना माझ्या गुरूंनी सांगितले पण असेल आधीच की माझ्या लेकीला तुमची गरज आहे... त्या मॅडम la कॉल केला... मग मॅडम परत आल्या जवळ अग आमच्या मॅडम येतात की नाही माहिती नाही कारण त्या आहेत above 75 years so त्या रोज एकदा खाली येतात 3 मजले उतरत... मग ज्या वर जातात ते मग काहीही केस येऊ देत त्या येत नाहीत..आणि आज त्या सकाळी येऊन गेल्या आहेत... पण आपण वाट बघू...!!मी नुसते स्मित हास्य केले, कारण मला माहिती होतं जे येतील ते माझे गुरू येतील... त्या मॅडम त्यांच्या होत्या पण माझ्यासाठी माझे गुरू होते... श्री गुरू सारखा असता पाठीराखा... 🙏🙏 

              मॅडम आल्या लांब उभ्या राहिल्या आणि माझ्या मॅडम la हातवारे करून दाखवले कि टाके इथे दे तिथे दे ... हिने पण दिले... मग काय bleeding पूर्ण थांबून गेले होते... त्या मॅडम च्या चेहर्‍यावर जे तेज होते त्यावेळी ते माझ्या गुरू प्रमाणे झळकत होते... मोठ्या मॅडम माझ्या जवळ आल्या..." बाळ मी आलेय ना आता सर्व काही ठीक होईल...काही चिंता करू नको.. माझ्या डोक्यावरून हात फिरवला.. तेव्हा मी त्यांना नमस्कार केला कारण ते साक्षात माझे सद्गुरू होते... 🙏🙏 तेवढे बोलून त्या निघून गेल्या...नंतर sisters आणि dr. जवळ आल्या माझ्या म्हणे ,"आमच्या मॅडम कसं काय आल्या ते नाही कळलं कारण आज पर्यंत कुठली पण केस असो त्या एकदा पायरी चढली की परत उतरत नाहीत... आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या आम्हाला पण जवळ येऊ देत नाहीत की कुठल्या पेशन्ट च्या जवळ जाऊन हात लावत नाहीत... तुझ्या जवळ येऊन तुझ्या डोक्यावरून हात फिरवला हे कसं झालं ते कळलं नाही आज... मी काहीही बोलले नाही... मग तर fix झाले होते की हा चमत्कार आहे... मी देवाचे आभार मानले की असे गुरू दिलेत की माझ्या साध्या हाकेला धावून आले फक्त माझ्यासाठी !!! 🙏🙏♥️ 

             माझ्या बाळाला अखिलेश la आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे... त्याच्यावर आपली कृपा अशीच राहू द्या प. पू. भाऊ आणि दादा...🙏🙏 माझ्या पदरात आपण 2 पुष्प टाकलेत कमलेश आणि अखिलेश...माझे जीवन धन्य झाले... आपण सदैव माझ्या पाठीशी उभे राहावे आणि माझ्या बाळांवर कृपा वृष्टी करावी हीच प्रार्थना करते... 🙏🙏💐💐 अखिलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद... खूप मोठा हो.. 🌈🥳🥳🥳🎂💥😘😘😘😘😘😘

सासरे

 स्मित हास्य सदैव ओठी ,

आम्हाला सोडून जाईपर्यंत प्रियजनांच्या भेटी, 

शेवटी मला का नाही भेटलात आबा;

ही एक खंत मोठी .... 


आज मी अशा स्वरुपात माझ्या आबांचे वर्णन करेल हे केव्हा वाटले पण नाही ... 

एक सासरा म्हणून नाही तर एक बाप म्हणून आबांनी माझ्याकडे सदैव लक्ष दिले... माझ्या प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालून ते माझ्या सोबत असत... 

मी नव्याने जेव्हा सून म्हणून घरात आले त्या दिवशी मला म्हणाले की,"बेटा तू ठीक आहेस ना?" तुझ्या वडीलांना फोन करून कळवले का की ठीक आहेस ते..ते काळजी करत असतिल!... "  आणि "या घरातील तुझा पहिला दिवस आहे पण लक्षात ठेव  की मी तुला मला महाराजांनी दिलेले फुल समजतो जे त्यांनी मला सोपविले त्या फुलाला मी असे पर्यंत खूप जपेल!"

   मला वाटते प्रत्येक मुलीला अजून काय हवे असते एवढेच नाही का?? ... मग कमलेश चा जन्म झाला... तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही... खूप सुख दिले मला तू  असे ते नेहमी म्हणायचे... त्यांनी जेवढे प्रेम..माया माझ्या मुलांवर केली ती त्यांना जन्मभर पुरेल एवढी केली... अखिलेश च्या वेळी मला बेडरेस्ट होती पण त्यांनी केव्हाच असे जाणवू दिले नाही की मी एकटीच आहे जी 9 महिने ...सतत काळजीपूर्वक माझी चौकशी करून मला काय हवे आहे काय नकोय ते करायचे.. 

" मी बाहेर जातोय तुला काही घेऊन येऊ का?.. नको म्हणले तरी काहीतरी घेऊन यायचे... उपवास असेल की लगेच उपवासाला चालतील ते पदार्थ घेऊन येत... 

    मला bore होत होते तर त्यांच्या बालपणी च्या गप्पा सांगत होते... सर्व भाऊ कसे आहेत ते कौतुक सांगत ... ते नेहमी मला म्हणत की प्राजक्ता दिवाकर दादा हे माझे सर्वस्व.. त्यांनी मला घडविले... त्यांनी तुझे कौतुक केले ना मला फार आनंद झाला आहे... आबा माझ्याशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारत होते... त्यांना नेहमी माझी काळजी वाटत होती.. की हिचे दुखते आहे आणि आपण काही करू नाही शकत.. म्हणायचे तू मला देऊन टाक बरं तुझे दुखणे... मला केव्हा म्हणले नाही की तू हे काम करत नाही ते करत नाही... त्यांचे काही दुखले की मला आधी येऊन सांगत मग मी काही यांना विचारून मेडिसिन देत... त्या दिवशी मी नव्हते आबा म्हणून तुम्ही कुणालाच लवकर सांगितले नाही की पोट दुखत आहे... माझी एवढी काळजी की दवाखान्यात पण म्हणायचे तिला त्रास होत असेल जा भेटायला तिला... !! आबा तुम्ही एकदा तरी मला सासर्‍यांच्या भूमिकेत जाऊन मला दाखवून द्यायचे ना... किती माया केली हो! माझी सकाळ होत होती ती तुमच्या सुप्रभात ने ... रात्री पण तुम्ही मला सांगून विचारून झोपायचे की तू ठीके ना बेटा काही दुखत वैगेरे नाही ना? जेव्हा मी हसेल तेव्हा म्हणायचे हेच तर बघायला आलो होतो...तुला हसताना बघितले की शांत झोप लागते... त्यांना माझा उदास चेहरा आवडत नाही म्हणून मी पण दुःख असेल तरी त्यांना दाखवत नव्हते पण माझ्याकडून पण कधी कधी असं होत होते की मी रागात असे मुलांवर आणि माझ्यावर की माझे कर्तव्य आहे ते असून माझी काळजी यांना कराव लागत आहे... पण त्यांनी कधी मला कुठले काम सांगितले नाही... त्यांना माझ्या हातचा चहा आवडत.. अग चहा तर सर्वच करतात पण तुझ्यासारखा नाही जमत... तुला माहिती की मला कसा लागतो ते... मी कुठली भाजी बनवत or new डिश बनवत की ते आवर्जून येतीलच तिथे " hmm क्या बन रहा है भाई !"  ... माझी रांगोळी जी घरातील असायची ती त्यांनी 8 दिवसानी मोडायचे..  प्रत्येक व्यक्तीला सांगत आमच्या प्राजक्ता ने काढली बरका!! एवढेच थांबायचे नाही तर माझे drawings त्या लोकांना दाखवण्यासाठी घेऊन जात होते... त्यांना भरभरून कौतुक सांगत होते... अखिलेश सोबत त्यांना फार आनंद होत होता..  तो जेव्हा बोलायला लागला तर त्याला चिडवत कारे मी सांभाळतो आणि अजून आबा म्हणत नाही तू!! मग हसायचे.. मी  पण म्हणत जाऊ द्या आबा तो मला पण मा नाही म्हणत अजून बघा ना! मग ते म्हणत आपण दोघे सोबत असतो ना त्याच्या म्हणून आपल्याला हाक नाही मारत तो... देईल आवाज तो काही दिवसांनी आपल्याला... 1 डिसेंबर पासून तो आबा आबा हाक मारायला लागला आणि तुम्ही ते ऐकून पण खूप दूर सोडून गेले... तो खूप मिस करतोय तुम्हाला रोज फोटो जवळ जातो तुमच्या डोक्यावरून हात फिरवून स्वतः च्या कपाळावर ठेवतो... तुमच्या मांडीवर बसायचे म्हणून फोटोच्या समोर बसतो पाटावर ..  खूप यातना होतात हे बघताना पण त्याला काहीही बोलता येत नाही की सांगता येत नाही.. आमच्या मनाची काहीही काळजी तुम्ही केली नाहीत अचानक आम्हाला सोडून गेलात... किती आनंदी होतात मी नाशिक ला 28 dec. La गेले तेव्हा..त्याच्या आदल्या रात्री जेवण सोबत केले आपण... तसेही मी जेवल्यावर तुम्ही जेवत.. किंवा सोबत बसत..  तुम्ही 27 dec. La म्हणाले की माझा वाढदिवस आहे की नाही कुणाच्या लक्षात.?? मी पण मग म्हणले की नाही बाबा केव्हा आहे?? हसायला लागले मग... मग मी म्हणले किती वर्षाचे व्हाल आबा तुम्ही आता? म्हणे 72 पूर्ण 73 लागेल... मग काय खुप गप्पा झाल्या...मी म्हणलं आपण आता तुमचे अमृत महोत्सव करू काही वर्षात असं तसं..  लगे पंचांग baghitla त्यांनी म्हणे आपली कार मार्च मध्ये येईल बरका!! भविष्य म्हणजे त्यांचा आवडीचा विषय... त्यांच्या पश्चात एक एक आठवणीने दिवस जड जातोय पण मनाला आता सांगितले की आबा नाही राहिले... माझा खूप मोठा आधार गेला... मला नेहमी म्हणायचे की तू घाबरू नको तुझा आबा आहे जो पर्यन्त चिंता करू नका... सांगायला बसले ना कादंबरी होईल एवढे आहे...2014 te 2022 या काळात एवढे भरभरून प्रेम दिले की मी धन्य झाले... यांचे  आबा म्हणता म्हणता माझे आबा केव्हा झाले कळले नाही... आबा तुमची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार आहे हे वचन देते... जिथे कुठे असाल तिथून मला आशिर्वाद द्याल असे काम मी करून दाखवेल... तुमच्या रुतब्याला कधी माझ्या कडून ठेच पोहोचू देणार नाही... मी कधीही काहीही चुकीची वागली असेल तर मला माफ करावे 🙏  miss you so much everyday...every time... 🙏🙏😔😔😔💐💐💐

आजोबा

 माझे super hero आदरणीय प्रिय बाबा (आजोबा)तुम्हाला 89 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार...🙏🙏💐

   तुमच्या बद्दल बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतात. कारण तुमच्या प्रेमाचा महिमा शब्दात मांडता येणार नाही.. बाबा तुम्ही ज्या प्रकारे आम्हा नातवंडांना संस्कारित केले त्यामुळे जीवन हिर्‍यासारखे उजळून गेले आहे... लहानपणी आम्ही जेव्हा धिंगाणा करायचो तेव्हा तुम्ही चिडत होता, तेव्हा राग येत होता की खेळू पण देत नाहीत...पळू पण देत नाहीत पण तेव्हा ही समज नव्हती की तुम्ही आम्हाला चांगल्या सवयी लावत आहात जेणेकरून पुढे जाऊन आम्हाला कुणी नाव ठेवले नाही पाहिजे... तुम्हाला आठवते का बाबा तुम्ही घराच्या आजुबाजुला जे झाडे होती त्याचा कचरा साफ करत तेव्हा आम्ही पण सोबत मध्ये मध्ये करत होतो... गच्चीवर उन्हाळ्यात टाकीतून पाणी टाकत होतो..खूप सुंदर आठवणी आहेत आपल्या... बाबा तुम्ही मला मातीपासून विविध प्रकारचे फळ भाज्या तयार करून दिल्या होत्या खूप भारी तयार केले होते ते... देवीला कशाप्रकारे सजवायचे ..तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव कसे ओळखावे हे तुमच्याकडून शिकले... लहानपणी तुमच्या ताटात जेवण करत होते तेव्हा तुम्ही प्रेमाने घास भरवत असत ..पण त्यांची चव आज मी काहीही जरी खाल्ले ना त्याला नाही येत...रोज एक दिवस जात नाही की तुमची जेवताना आठवण मला होत नाही...खूप अविस्मरणीय क्षण मी अनुभवले आहेत बाबा तुमच्या सोबत..जी drawing शिकले ती तुमच्या कडून शिकले आहे ...तुमची मायेची हाक मला इथे कधी मी अस्वस्थ असते तेव्हा ऐकू येते..तुमच्या आशिर्वादाने माझं आयुष्य फुलून गेले आहे... 

तुमचं हास्य..तुमचे कष्ट..तुमच्यातील जिद्द..आजही ओसंडून जाणारा उत्साह हे गुण आमच्यात पण यावेत.. 

शिस्त काय असते ती तुम्ही शिकविली..

तुम्ही मला अंगा खांद्यावर खेळवले..तुम्हीच मला सुसंस्कृत बनविले..खरच भाग्यवान आहोत आम्ही तुम्ही आजोबा म्हणून आम्हाला लाभले...म्हणतात ना घरात आजी शिवाय संस्कार नाहीत..आजोबा शिवाय संघर्ष नाही..आणि आजी आजोबा शिवाय चार भिंतीचे घर नाही .. आज पण वाटते की तुमच्या हाताने लहानपणी सारखे जेवावे.. तुम्ही आम्हाला आमच्या प्रत्येक क्षणात हवे आहात... तुम्ही परभणी मध्ये असलात तरी मला आधार वाटतो की मला काहीही अडचण आली तरी तुम्ही आहात मागे खंबीरपणे उभे ... माझ्या आयुष्यात तुमचे स्थान हे खूप मोठे आहे बाबा... असे म्हणतात की ,आजोबा हे पहिले जिवलग मित्र असतात तसेच तुम्ही आहात .. जगदंबेला हीच प्रार्थना की तुमच्या वयाची जेव्हा मी होईल तेव्हा माझा स्वभाव हा तुमच्या सारखाच दयाळू आणि प्रेमळ राहू दे...तुमची साथ ही जन्मभर राहू दे...तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे ..तुमचे जिवन निरामय होवू दे.. तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य दे... हॅप्पी birthday बाबा...

आजोळ

 " आजोळ " हा शब्द कुठे ऐकायला आला तरी आपणास लगेच दिसतात ते आज्जी-आजोबा! कारण जेवढे आपण आजोळी राहतो तेवढ्या थोड्या वेळामध्ये आपल्याला भरभरून प्रेम करणारे आज्जी आजोबा हे जगात कुठेही मिळणार नसतात... 

    तसेच काहीसे माझे आहे.. हल्लीच्या भाषेत माझे आज्जी आजोबा हे मी तर म्हणेन सुपर wife and super husband... खूप छान bonding आहे दोघांमध्ये..हल्ली अशी जोडी दिसत नाही..अहो टिकली तर पाहिजे कारण आजकाल 62 वर्षे एकमेकांना एवढे समजून घेणे हे दुर्मिळ आहे... माझे भाग्यही तेवढेच आहे कारण एवढे वर्षे आज्जी आजोबा चा सहवास लाभणे हे आजकाल शक्य नाही... 

          मी 4th मध्ये असताना वडिलांची बदली सेलू येथे झाली म्हणजेच माझ्या आजोळी... तेव्हा पासून संपूर्ण शिक्षण होईपर्यंत आम्ही selu मध्ये होतो... म्हणून आजोबांना selu बाबा आणि आज्जी ला ताई आज्जी असे म्हणतो...रोजचा सहवास लाभला त्यांचा आणि मावशी चा... खूप अतोनात प्रेम करतात ते माझ्यावर... हे काहींना फार नवल वाटते पण प्रत्येक क्षण मी त्यांच्या सोबत शेअर करत होती आणि ते माझ्याजवळ... त्यामुळे तेवढे bonding नक्कीच आमच्या मध्ये निर्माण झाले... मला फार भारी वाटत कारण "मनोहर हेलवाडे" यांची नात ओळख सांगितली तर इतके लोक मान देत होते respect काय असतो तो मला त्या वयात कळला...आणि हा respect मिळवायला काहीतरी आधी करावे लागते..झिजावे लागते.. पण आजोबांना याचा थोडापण गर्व नाही याचा फार अभिमान वाटतो... तेव्हढीच ताई आज्जीने त्यांना साथ दिली.. 

Selu बाबा सोबत गप्पा मारायला आणि ताई आज्जी सोबत काहीतरी new recipe करायला फार आवडत असे मला अजून पण त्या दोघांसाठी त्यांच्या कडे जातेच मी... कारण भाग्यरेषा ही कुणाला नसते माहिती पण त्यांनी घर पण आता माझ्याच गावी केले त्यामुळे तिथे मी नेहमीच जाते कारण मी गेल्यावर त्यांना आनंद मिळतो आणि मलापण ... लोकांना वाटते की जरा जास्तच प्रेम आहे यांचे माझ्यावर तर हो आहेच आणि प्रेम हे हिसकावून नसते घेता येत ना... एवढे वर्ष आम्ही सर्व राहिलो आहोत तर प्रेम हे होईलच... माझे सर्व आज्जी आजोबा हे बेस्ट फ्रेंड आहेत माझे... माझ्या प्रत्येक गोष्टी त्यांना मी शेअर केल्या आहेत आणि करते... मला नाही वाटत कुणी इतके स्वतः बद्दल शेअर करत असेल आजच्या भाषेत privacy.. ती आमच्यात कधीच नव्हती आणि होणार... आजी आजोबा यांनी जी शिस्त शिकवली ती आयुष्य उज्वल करत आहे... 

    Selu बाबा हे एक मोठे वकील आहेत... त्यामुळे जगाची ओळख त्यांनी मला करुन दिली... selu बाबा हिशोबात खूप पक्के आहेत मला जसे कळते तसं त्यांची हिशेबाची वही बघते.. त्यामुळे कुणीही त्यांना फसवू शकत नाही..ही गोष्ट त्यांच्याकडून शिकले..

   घरातील व्यवस्था ही हल्ली सर्व बायकोने बघावी ही समजूत होऊन बसलीये पण ताई आज्जी ला प्रत्येक गोष्टीत यांनी साथ दिली... नाहीतर आजकाल नावाने नवरा बायको राहतात लोक तू तिथे मी इथे असे वागणूक असते.. नुसतेच प्रेम दिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला प्रेम व्यक्त करताना दिसतात तसे ताई आज्जी आणि selu बाबा यांचे नाही प्रेम म्हणजे काय ते या दोघांना बघितले की कळते... संभाषण हा प्रकार हल्ली च्या जोडप्यांना माहिती नाही ते या दोघांनी मला दाखवले... ताई आज्जी ही खूप हळवी ...प्रेमळ आणि सात्विक.. निस्वार्थी.. भरभरून प्रेम देणारी... एक अल्लड लहान मुल जसे संपूर्ण घराला प्रसन्न ठेवते तसा हिचा चेहरा..कधीही कुणाबद्दल द्वेष..कलह नाही..कुणाचा मत्सर नाही... देव खूप सुख देत असतो आपणास पण ते निवडता पण आले पाहिजे ना ते हिने निवडले खूप कष्टाने सर्व कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवले... 

     लोकांना आजकाल पैशांचा मोठेपणा गाजवायला फार आवडते पण माझे आजोळ असे आहे की प्रत्येक जणांकडून मनाचा मोठेपणा शिकण्यासारखे आहे... प्रत्येक नाते ही संस्था आहे..तशीच आजी आजोबा ही एक संस्था आहे ज्या संस्थेला आजच्या काळात तडे जात आहेत त्या संस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे...

        Selu बाबा आणि ताई आज्जी तुम्ही दोघे माझ्या साठी नुसते आज्जी आजोबा नसून आदर्श व्यक्तिमत्त्व आहात .. तुम्ही आहात म्हणून मी आहे... तुम्हाला 62 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा साष्टांग दंडवत... देवाला हीच प्रार्थना की प्रत्येक जन्मी हेच माझे आजी आजोबा म्हणून दे.. कारण यांनी मला जसे घडवले तसे कुणी घडवले नसते... selu baba and Tai aajji you are my support system ..my pillers..my strength.. !! 


Happy Anniversary both of you 💐 

lots of love ❤️ 

             - Prajakta Abhishek Sudame

माझं लहान बाळ

 आज अखिलेश 4 वर्षांचा झाला...कमलेश झाल्यानंतर 5 वर्षांनी अखिलेश च्या येण्याची चाहूल लागली... सर्वांनाच खूप आनंद झाला..मला आनंद पण झाला होता पण एकीकडे वाटत होते कमलेशवर या गोष्टीचा परिणाम तर नाही ना होणार?कारण कमलेशला माझ्याशिवाय केव्हाच राहिला नव्हता आणि मी सुद्धा... पहिले बाळ असल्याने जिवापाड प्रेम आहे त्याच्यावर माझे... तो पण खूप म्हणजे खूप प्रेम करतो माझ्यावर.. मग अशात आमच्या दोघात एक दूसरे बाळ येणार हे त्याला सांगितले पण त्याने ते accept केले त्याला खूप आनंद झाला होता...रोज माझ्या जवळ येऊन गप्पा मारत बसत होता बाळाशी मग म्हणे बाळ बोलत का नाही? मी मग त्याच्या आनंदासाठी बाळ बोलतोय असे बोलून त्याला बोलत होते... अशा प्रकारे महीने निघून गेले होते.. पण bed rest असल्याने 4 महीने मी एकाच रूम मध्ये होते..या काळात माझ्या सासुबाई आणि आबांनी म्हणजेच सासर्‍यांच्या सहकार्याने मला हिम्मत आणि मानसिक आधार मिळाला...त्यांनी खूप काळजी घेतली.. आबांनी मला करमत नव्हते तर खूप काही जुन्या आठवणी सांगत होते की त्यांचे बालपण..त्यांच्या नोकरी बद्दल किस्से..खूप छान bonding निर्माण झाली होती आमच्यात..ते म्हणाले बेटा तुला महाराजांनी माझ्या हातात एका फुला प्रमाणे दिलेय तुला तसेच मी सांभाळणार त्याला सुकून जाऊ देणार नाही... तुझे आबा जो पर्यंत आहेत तोपर्यंत तू बिनधास्त रहा... असे सासरे मिळायला भाग्य लागते ते माझे आहे...नंतर 5 व्या महिन्यात मी नाशिक ला गेले Corona सुरू झाला आहे असे कळाले..मग hospital मध्ये चेक करायला पाहिजे हे माहिती होते पण हिम्मत होत नव्हती... आईच्या मैत्रीण मोठी dr. आहे तर तिने फोन वरुण treatment दिली...काहीही त्रास झाल की तिनी खूप छान मदत केली...मग सोनोग्राफी तिसर्‍या महिन्यानंतर directly 7 व्या महिन्यात केली Corona मुळे.. घरात मग मन रमायचे कारण पर्याय नव्हताच...कमलेश, माझे आई वडील आणि मी एवढेच घरातल्या घरात games खेळायचो कमलेश सोबत..आईने आणि दादांनी खूप म्हणजे खूप काळजी घेतली त्या परिस्थितीत आम्हा दोघांनाही काही होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम सुरू होती रोज उठले तसे..माझ्या दोन्ही बाळांना मी जन्म दिला पण माझ्या आई दादांनी जर साथ दिली नसती तर मी काहीही करू शकले नसते..नंतर 8 वा महीना लागायच्या आत आम्ही औरंगाबाद ला वापस आलो डिलिव्हरी साठी.. मग hospital मध्ये कुठल्या जावे हे पण माहिती नव्हते पण गेलो एक ठरवले होते तिथे 

.. treatment काहीही दिली नाही तिथे पण 14 दिवसानी या म्हणे आम्ही चेक नाही करणार..मग परत गेलो सोनोग्राफी केली.. परत 9 वा लागल्यावर 24 दिवसानी गेलो म्हणे आत्ता होत नाही तुझी डेट नंतर आहे..पण दुसर्‍याच दिवशी त्रास सुरू झाला सकाळी 6.30 ला.. मग 10 वाजता गेलो hospital मध्ये evening 6.40 la अखिलेश झाला... मग घरी 4 दिवसांनी आलो स्वागत झाले पण कमलेश माझ्या जवळ पण येत नव्हता..त्याला काय वाटलं ते माहिती नाही पण मला खूप रडू आले की माझ्या जवळ दूसरे बाळ बघून माझ्या पहिल्या बाळाला मी दुखावले तर नाही ना? नंतर 2 तासांनी तो जवळ आला होता...बाळाला हात लावून बघू का ग माँ मी असे विचारलं म्हणलं लाव तुझा भाऊ आहे ना रोज बोलत होतास ना तू? म्हणे हो म्हणजे आता हा बोलेल मला म्हणलं त्याला बोलता येत नाही अजून! मग काय असे दिवसावर दिवस गेले..अखिलेश मोठा होत होता त्याचे बोबडे बोल खूप छान वाटायचं..कमलेश त्याला फार जपून खेळवत..जरा रडला की कमलेश la रडू येत..सोबत नवर्‍याची साथ होती Akhileshche जे काहीकाम पडेल ते करत होते..अजून पण करतात. अखिलेश त्याच्या बाबांचा fan आणि कमलेश माझा असे आहे.. पण कमलेश आणि अखिलेश माझ्या साठी बलराम कृष्ण आहेत...Akhilesh खूप खोडकर आणि कमलेश शांत.. अशी जोडी माझ्या बाळांची... आज अखिलेश 4 वर्षांचा झाला त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद...🥳💐❤️😘😘💫

लहान भाऊ

 भाऊ हा प्रत्येक बहिणीसाठी खूप महत्वाचा आणि प्रिय व्यक्ति असतो... तसेच माझे भाऊ.. गोष्ट माझ्या लहानपणीची...

आमचे मोठे एकत्र कुटुंब होते..त्यात माझे आजी -आजोबा, माझे आई -वडील आणि तीन काका -तीन काकु... असे मोठे कुटुंब... माझे वडील मोठे आहेत तर आम्ही दोघे भाऊ बहीण घरी 2 घे होतो पहिले.. मग माझ्या 2 no. च्या काकांना मुलगा झाला..खूप गोंडस बाळ..मी इनमिन 5 ते 6 वर्षांची असेल... माझ्या नंतर हे घरात हे पहिलेच बाळ आलेले..मला फार म्हणजे फार कुतूहल त्याला घेता पण येत नव्हते पण काकु ने केव्हा म्हणले नाही की तू लहान आहेस घेऊ नको... माझ्या सर्व काकूंनी फार माया लावलेली आम्हा सर्व भावंडांना... सख्खे भाऊ चुलत भाऊ कधी माहिती पण नव्हते काय असत हे... रोहित ला मी फार खेळायचे पाठीवरून घोडा घोडा..तो सारखं ताई ताई करत मागे..1st टाइम त्यानेच ताई म्हणले ते पण बोबड्या बोलात..त्यामुळे एक जबाबदार feeling येत होती की आपण मोठे झालोय...काकू office la जात होती तर घरी आजी आणि माझी आईच नंतर त्याला बघायच्या.. तेव्हा cerelac new निघालेले होते ते आज्जी त्याला देत होती तर मी पण मग थोडे दे म्हणून हट्ट करून खायची..रोहित मोठा होत होता तसा खेळायला मजा येत होती.. घरभर रांगत रांगत खोड्या चालू..त्याच्या मागे मी आणि माझा मोठा भाऊ ..

रोहित आता चांगला चालायला लागला होता मग आमच्याकडे बंगई आणली हल्ली झोपाळा म्हणतात.. त्यावर मग आम्ही तिघे फार मजा करायचो..भाऊ मागे उभे राहून झोका घेत..त्याच्या समोर आम्ही दोघे बसायचो .. मग game विमान विमान खेळ..कुठे बस-रेल्वे असे काहीही खेळ.. भाऊचे डायलॉग सुरू असायचे तोच ड्राइवर..कंडक्टर..पायलट सर्व... असे game किमान 2 तास आरामात चालत होते... तेव्हा tv होता पण black and white.. tv वर जास्त काही program नसायचे लहान मुलांसाठी so ते बघत नव्हतो आम्ही.. मग उन्हाळ्यात गच्चीवर जायचे संध्याकाळी मस्त बाबा सोबत म्हणजे आजोबांसोबत पाण्याचा सडा टाकायचा म्हणजे रात्री आम्ही सर्वजण गच्चीवर झोपू तेव्हा थंड व्हावी गच्ची.. ती पण मजा असते एक गच्चीवर मोठी सतरंजी आणि काही गाद्या टाकून झोपायचे मग आकाशात तारे मोजायचे..कुठे कुठला तारा हे बघायचा.. रोहित लहानपणापासून खूप brilliant आहे..त्याचे फोकस फक्त अभ्यासाकडे रहायचे तो खेळत पण होता..गाणे पण गात होता..painting पण करायचा..all rounder म्हणतो न तसं व्यक्तिमत्त्व म्हणजे रोहित.. सर्व विषयानुसार त्याचे निरखून अभ्यास करने तो समजून घेणे.. स्वभाव खूप शांत आणि समजदार... तसा मिश्किल पण आहे .. आता श्रुती म्हणेल ताईने भलतीच स्तुति लावली...😃😃 पण रोहित माझा फार लाडका आहेच मुळात कारण माझ्या नंतर घरातील लहान म्हणजे तोच म्हणून फार लाडका सर्वांचा... दिसायला कृष्ण असा मोहून टाकणारा आहे..पण मर्यादापुरुषोत्तम रामासारखा... आता अमेरिकेत गेलाय पण तरीही देशपांडे आहोत हे संस्कार विसरला नाही... नाहीतर हल्ली मुलांना बिघडायला निमित्त हवे असते... पण रोहित ने केव्हाच असे काहीही कृत्य केले नाही ज्याने आम्हाला त्याची खंत वाटेल..तात्या आणि काकू ने खूप छान संस्कार केलेत म्हणून रोहित चा खुप अभिमान वाटतो आणि वाटत राहील. आमच्याकडे असा भेदभाव केव्हाच केला गेला नाही की हा सख्खाभाऊ हा चुलतभाऊ.. म्हणून आम्ही सर्व भाऊ बहीण कधीच असे मानत नाहीत.. आता बाकीचे भाऊ बहीण हे वाचून म्हणतील ताईला रोहित प्रिय आहे म्हणून लिहिले पण तसं नाहिये तुम्ही सर्वच माझे प्रिय आहात.. पण म्हणतात ना पाहिले बाळ .. पहिले लहान भाऊ or बहीण जास्त लाडकं असते तसेच काहीसे रोहीत च्या बाबतीत आहे माझे ..खूप आठवणी आहेत त्याच्यासोबत.. त्यामुळे रोहित कितीही मोठा झाला तरी तो माझ्यासाठी लहान राहील..आणि लाडका..!! 

..रोहित चा आज वाढदिवस..रोहित तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद..खूप खूप प्रेम..खूप मोठा हो.दीर्घायुषी हो. तुला जगातील सर्व सुख मिळो..देवाची आणि सद्गुरु यांची कृपा तुझ्यावर सदैव राहो ही प्रार्थना करते..