स्मित हास्य सदैव ओठी ,
आम्हाला सोडून जाईपर्यंत प्रियजनांच्या भेटी,
शेवटी मला का नाही भेटलात आबा;
ही एक खंत मोठी ....
आज मी अशा स्वरुपात माझ्या आबांचे वर्णन करेल हे केव्हा वाटले पण नाही ...
एक सासरा म्हणून नाही तर एक बाप म्हणून आबांनी माझ्याकडे सदैव लक्ष दिले... माझ्या प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालून ते माझ्या सोबत असत...
मी नव्याने जेव्हा सून म्हणून घरात आले त्या दिवशी मला म्हणाले की,"बेटा तू ठीक आहेस ना?" तुझ्या वडीलांना फोन करून कळवले का की ठीक आहेस ते..ते काळजी करत असतिल!... " आणि "या घरातील तुझा पहिला दिवस आहे पण लक्षात ठेव की मी तुला मला महाराजांनी दिलेले फुल समजतो जे त्यांनी मला सोपविले त्या फुलाला मी असे पर्यंत खूप जपेल!"
मला वाटते प्रत्येक मुलीला अजून काय हवे असते एवढेच नाही का?? ... मग कमलेश चा जन्म झाला... तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही... खूप सुख दिले मला तू असे ते नेहमी म्हणायचे... त्यांनी जेवढे प्रेम..माया माझ्या मुलांवर केली ती त्यांना जन्मभर पुरेल एवढी केली... अखिलेश च्या वेळी मला बेडरेस्ट होती पण त्यांनी केव्हाच असे जाणवू दिले नाही की मी एकटीच आहे जी 9 महिने ...सतत काळजीपूर्वक माझी चौकशी करून मला काय हवे आहे काय नकोय ते करायचे..
" मी बाहेर जातोय तुला काही घेऊन येऊ का?.. नको म्हणले तरी काहीतरी घेऊन यायचे... उपवास असेल की लगेच उपवासाला चालतील ते पदार्थ घेऊन येत...
मला bore होत होते तर त्यांच्या बालपणी च्या गप्पा सांगत होते... सर्व भाऊ कसे आहेत ते कौतुक सांगत ... ते नेहमी मला म्हणत की प्राजक्ता दिवाकर दादा हे माझे सर्वस्व.. त्यांनी मला घडविले... त्यांनी तुझे कौतुक केले ना मला फार आनंद झाला आहे... आबा माझ्याशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारत होते... त्यांना नेहमी माझी काळजी वाटत होती.. की हिचे दुखते आहे आणि आपण काही करू नाही शकत.. म्हणायचे तू मला देऊन टाक बरं तुझे दुखणे... मला केव्हा म्हणले नाही की तू हे काम करत नाही ते करत नाही... त्यांचे काही दुखले की मला आधी येऊन सांगत मग मी काही यांना विचारून मेडिसिन देत... त्या दिवशी मी नव्हते आबा म्हणून तुम्ही कुणालाच लवकर सांगितले नाही की पोट दुखत आहे... माझी एवढी काळजी की दवाखान्यात पण म्हणायचे तिला त्रास होत असेल जा भेटायला तिला... !! आबा तुम्ही एकदा तरी मला सासर्यांच्या भूमिकेत जाऊन मला दाखवून द्यायचे ना... किती माया केली हो! माझी सकाळ होत होती ती तुमच्या सुप्रभात ने ... रात्री पण तुम्ही मला सांगून विचारून झोपायचे की तू ठीके ना बेटा काही दुखत वैगेरे नाही ना? जेव्हा मी हसेल तेव्हा म्हणायचे हेच तर बघायला आलो होतो...तुला हसताना बघितले की शांत झोप लागते... त्यांना माझा उदास चेहरा आवडत नाही म्हणून मी पण दुःख असेल तरी त्यांना दाखवत नव्हते पण माझ्याकडून पण कधी कधी असं होत होते की मी रागात असे मुलांवर आणि माझ्यावर की माझे कर्तव्य आहे ते असून माझी काळजी यांना कराव लागत आहे... पण त्यांनी कधी मला कुठले काम सांगितले नाही... त्यांना माझ्या हातचा चहा आवडत.. अग चहा तर सर्वच करतात पण तुझ्यासारखा नाही जमत... तुला माहिती की मला कसा लागतो ते... मी कुठली भाजी बनवत or new डिश बनवत की ते आवर्जून येतीलच तिथे " hmm क्या बन रहा है भाई !" ... माझी रांगोळी जी घरातील असायची ती त्यांनी 8 दिवसानी मोडायचे.. प्रत्येक व्यक्तीला सांगत आमच्या प्राजक्ता ने काढली बरका!! एवढेच थांबायचे नाही तर माझे drawings त्या लोकांना दाखवण्यासाठी घेऊन जात होते... त्यांना भरभरून कौतुक सांगत होते... अखिलेश सोबत त्यांना फार आनंद होत होता.. तो जेव्हा बोलायला लागला तर त्याला चिडवत कारे मी सांभाळतो आणि अजून आबा म्हणत नाही तू!! मग हसायचे.. मी पण म्हणत जाऊ द्या आबा तो मला पण मा नाही म्हणत अजून बघा ना! मग ते म्हणत आपण दोघे सोबत असतो ना त्याच्या म्हणून आपल्याला हाक नाही मारत तो... देईल आवाज तो काही दिवसांनी आपल्याला... 1 डिसेंबर पासून तो आबा आबा हाक मारायला लागला आणि तुम्ही ते ऐकून पण खूप दूर सोडून गेले... तो खूप मिस करतोय तुम्हाला रोज फोटो जवळ जातो तुमच्या डोक्यावरून हात फिरवून स्वतः च्या कपाळावर ठेवतो... तुमच्या मांडीवर बसायचे म्हणून फोटोच्या समोर बसतो पाटावर .. खूप यातना होतात हे बघताना पण त्याला काहीही बोलता येत नाही की सांगता येत नाही.. आमच्या मनाची काहीही काळजी तुम्ही केली नाहीत अचानक आम्हाला सोडून गेलात... किती आनंदी होतात मी नाशिक ला 28 dec. La गेले तेव्हा..त्याच्या आदल्या रात्री जेवण सोबत केले आपण... तसेही मी जेवल्यावर तुम्ही जेवत.. किंवा सोबत बसत.. तुम्ही 27 dec. La म्हणाले की माझा वाढदिवस आहे की नाही कुणाच्या लक्षात.?? मी पण मग म्हणले की नाही बाबा केव्हा आहे?? हसायला लागले मग... मग मी म्हणले किती वर्षाचे व्हाल आबा तुम्ही आता? म्हणे 72 पूर्ण 73 लागेल... मग काय खुप गप्पा झाल्या...मी म्हणलं आपण आता तुमचे अमृत महोत्सव करू काही वर्षात असं तसं.. लगे पंचांग baghitla त्यांनी म्हणे आपली कार मार्च मध्ये येईल बरका!! भविष्य म्हणजे त्यांचा आवडीचा विषय... त्यांच्या पश्चात एक एक आठवणीने दिवस जड जातोय पण मनाला आता सांगितले की आबा नाही राहिले... माझा खूप मोठा आधार गेला... मला नेहमी म्हणायचे की तू घाबरू नको तुझा आबा आहे जो पर्यन्त चिंता करू नका... सांगायला बसले ना कादंबरी होईल एवढे आहे...2014 te 2022 या काळात एवढे भरभरून प्रेम दिले की मी धन्य झाले... यांचे आबा म्हणता म्हणता माझे आबा केव्हा झाले कळले नाही... आबा तुमची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार आहे हे वचन देते... जिथे कुठे असाल तिथून मला आशिर्वाद द्याल असे काम मी करून दाखवेल... तुमच्या रुतब्याला कधी माझ्या कडून ठेच पोहोचू देणार नाही... मी कधीही काहीही चुकीची वागली असेल तर मला माफ करावे 🙏 miss you so much everyday...every time... 🙏🙏😔😔😔💐💐💐
No comments:
Post a Comment