आज अखिलेश 4 वर्षांचा झाला...कमलेश झाल्यानंतर 5 वर्षांनी अखिलेश च्या येण्याची चाहूल लागली... सर्वांनाच खूप आनंद झाला..मला आनंद पण झाला होता पण एकीकडे वाटत होते कमलेशवर या गोष्टीचा परिणाम तर नाही ना होणार?कारण कमलेशला माझ्याशिवाय केव्हाच राहिला नव्हता आणि मी सुद्धा... पहिले बाळ असल्याने जिवापाड प्रेम आहे त्याच्यावर माझे... तो पण खूप म्हणजे खूप प्रेम करतो माझ्यावर.. मग अशात आमच्या दोघात एक दूसरे बाळ येणार हे त्याला सांगितले पण त्याने ते accept केले त्याला खूप आनंद झाला होता...रोज माझ्या जवळ येऊन गप्पा मारत बसत होता बाळाशी मग म्हणे बाळ बोलत का नाही? मी मग त्याच्या आनंदासाठी बाळ बोलतोय असे बोलून त्याला बोलत होते... अशा प्रकारे महीने निघून गेले होते.. पण bed rest असल्याने 4 महीने मी एकाच रूम मध्ये होते..या काळात माझ्या सासुबाई आणि आबांनी म्हणजेच सासर्यांच्या सहकार्याने मला हिम्मत आणि मानसिक आधार मिळाला...त्यांनी खूप काळजी घेतली.. आबांनी मला करमत नव्हते तर खूप काही जुन्या आठवणी सांगत होते की त्यांचे बालपण..त्यांच्या नोकरी बद्दल किस्से..खूप छान bonding निर्माण झाली होती आमच्यात..ते म्हणाले बेटा तुला महाराजांनी माझ्या हातात एका फुला प्रमाणे दिलेय तुला तसेच मी सांभाळणार त्याला सुकून जाऊ देणार नाही... तुझे आबा जो पर्यंत आहेत तोपर्यंत तू बिनधास्त रहा... असे सासरे मिळायला भाग्य लागते ते माझे आहे...नंतर 5 व्या महिन्यात मी नाशिक ला गेले Corona सुरू झाला आहे असे कळाले..मग hospital मध्ये चेक करायला पाहिजे हे माहिती होते पण हिम्मत होत नव्हती... आईच्या मैत्रीण मोठी dr. आहे तर तिने फोन वरुण treatment दिली...काहीही त्रास झाल की तिनी खूप छान मदत केली...मग सोनोग्राफी तिसर्या महिन्यानंतर directly 7 व्या महिन्यात केली Corona मुळे.. घरात मग मन रमायचे कारण पर्याय नव्हताच...कमलेश, माझे आई वडील आणि मी एवढेच घरातल्या घरात games खेळायचो कमलेश सोबत..आईने आणि दादांनी खूप म्हणजे खूप काळजी घेतली त्या परिस्थितीत आम्हा दोघांनाही काही होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम सुरू होती रोज उठले तसे..माझ्या दोन्ही बाळांना मी जन्म दिला पण माझ्या आई दादांनी जर साथ दिली नसती तर मी काहीही करू शकले नसते..नंतर 8 वा महीना लागायच्या आत आम्ही औरंगाबाद ला वापस आलो डिलिव्हरी साठी.. मग hospital मध्ये कुठल्या जावे हे पण माहिती नव्हते पण गेलो एक ठरवले होते तिथे
.. treatment काहीही दिली नाही तिथे पण 14 दिवसानी या म्हणे आम्ही चेक नाही करणार..मग परत गेलो सोनोग्राफी केली.. परत 9 वा लागल्यावर 24 दिवसानी गेलो म्हणे आत्ता होत नाही तुझी डेट नंतर आहे..पण दुसर्याच दिवशी त्रास सुरू झाला सकाळी 6.30 ला.. मग 10 वाजता गेलो hospital मध्ये evening 6.40 la अखिलेश झाला... मग घरी 4 दिवसांनी आलो स्वागत झाले पण कमलेश माझ्या जवळ पण येत नव्हता..त्याला काय वाटलं ते माहिती नाही पण मला खूप रडू आले की माझ्या जवळ दूसरे बाळ बघून माझ्या पहिल्या बाळाला मी दुखावले तर नाही ना? नंतर 2 तासांनी तो जवळ आला होता...बाळाला हात लावून बघू का ग माँ मी असे विचारलं म्हणलं लाव तुझा भाऊ आहे ना रोज बोलत होतास ना तू? म्हणे हो म्हणजे आता हा बोलेल मला म्हणलं त्याला बोलता येत नाही अजून! मग काय असे दिवसावर दिवस गेले..अखिलेश मोठा होत होता त्याचे बोबडे बोल खूप छान वाटायचं..कमलेश त्याला फार जपून खेळवत..जरा रडला की कमलेश la रडू येत..सोबत नवर्याची साथ होती Akhileshche जे काहीकाम पडेल ते करत होते..अजून पण करतात. अखिलेश त्याच्या बाबांचा fan आणि कमलेश माझा असे आहे.. पण कमलेश आणि अखिलेश माझ्या साठी बलराम कृष्ण आहेत...Akhilesh खूप खोडकर आणि कमलेश शांत.. अशी जोडी माझ्या बाळांची... आज अखिलेश 4 वर्षांचा झाला त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद...🥳💐❤️😘😘💫
No comments:
Post a Comment