जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा अनेक नाती आपल्या जीवनात येतात... त्यात आज्जी आणि आजोबा यांचं नातं हे आपल्या आयुष्यात फार मोलाचं असतं... म्हणतात ना मुलांचा मुलगा किंवा मुलगी दुधावरची साय असते तशी आज्जी - आजोबा त्या नातवांवर मुलांपेक्षा खूप प्रेम करतात... अखंड अशी न संपणारी माया लावतात...
ज्यात कसलाही स्वार्थ नसतो... आमचे आज्जी आणि बाबा म्हणजे आमच्यासाठी जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहेत... त्यांनी आम्हाला माया जेवढी केली तेवढीच शिस्त लावून घडवले... त्यांच्या संस्कारांनी आम्हाला परिपूर्ण आयुष्य मिळाले...त्यांच्या विषयी मी कितीही बोलले तरीही शब्द अपुरे पडतील.. आज बाबांचा वाढदिवस आहे म्हणून बाबा तुमच्या विषयी माझ्या मनातील भावनांचे औक्षण माझ्या करतेय कारण प्रत्यक्ष मी तिथे येऊ नाही शकले ना!! माझ्यासाठी तुमचं असणं हे माझ्यावर भगवंताची किती कृपा आहे ते मला कळते.. तुम्ही जितके प्रेम आणि वस्तल्यानी मला घडवले त्याचे ऋण मी या जन्मात तरी फेडू नाही शकणार बाबा... लहानपणी तुमच्या सोबत जगलेल्या अविस्मरणीय आठवणी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आहेत... देवावरची न सांगता येण्याएवढी अपार श्रद्धा ही तुम्ही दाखवून दिलीत.. तुम्ही देवीची ज्या मनोभावे पूजा करत असता,तिला देखणे रूप येण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांनी सजवून डोळ्यांचे पारणे फिटेल अशी ती तुमच्या सेवेला खुष असते ते तिच्याकडे बघून दिसून येते... तुम्ही पूर्वी पासून रोज सकाळी फिरायला जात नंतर व्यायाम, मग वेळेवर नाश्ता, मग पेपर वाचन ज्याने तुम्हाला जगातील घडामोडी कळतील, मग देवीची पूजा व आराधना करणे हे सर्व बघून कुठे तरी वाटत होते की एवढ्या उल्हासाने रोजची दिनचर्या कशी जमत असेल...?? मी खरं सांगते की हे मला नाही जमले अजूनपण 😄
मला आठवते तुम्ही रोज झाडाची काळजी घेत असत.. तेव्हा आम्हाला पण साफ करा म्हणून म्हणत पण आम्ही त्यावेळी लहान असल्याने अक्कल शून्य होतो तेव्हा आम्हाला कंटाळा येत होता पण आज तशाच छोट्या छोट्या क्षणांना आठवले की डोळ्यात पाणी येते आणि आपण किती मूर्ख होतो ही जाणीव होते... तुम्ही तुम्हाला मदत हवी म्हणून नव्हता सांगत तर त्यातून हे शिकवायचा प्रयत्न करत होते की कुठलेच काम हे छोटे किंवा मोठे , स्वच्छ किंवा घाण नसते ..काम हे काम असते...!! तुमच्यातील जीवन जगण्यासाठी ते जीवन कसे सुंदर जगता येईल हे आम्हांला तुम्ही शिकवले... कुठल्याही परिस्थितीत जीवनात हताश न होता त्यातून हसत हसत मार्ग कसा काढता येईल हे तुम्ही मला शिकवले.. मी या जगात वावर करताना प्रत्येक क्षणाला ही जाणीव ठेऊन वागते की आपण कुणाची नात आहोत..? मी जर काही असभ्य प्रकारे वागले तर मला कुठेतरी खंत ही वाटते की आपल्या आज्जी आणि बाबा,आई व दादा ला काय वाटेल हे पाहून? म्हणून सदैव प्रयत्न हाच असतो की तुम्ही दिलेल्या संस्कारांवर कुणीही शिंतोडे उडवू नये.. आजच्या युगात आम्ही खूप भाग्यवान आहोत बाबा की तुम्ही आमच्या सोबत आहात... तुमच्या असण्याने आम्हाला सर्व संकटांवर मात करण्यासाठी बळ मिळते... तुमचे आशीर्वाद इतके आहेत की आजवर मला खूप संकटातून तारले.. आई जगदंबा तुम्हाला अखंड आमच्या सोबत राहू देत...तुमच्यावरील तिची कृपादृष्टी क्षणोक्षणी वाढत जावो..
माझ्या कडून लहानपणापासून काहीही आजवर तुम्हाला काही अपशब्द बोलला गेला असेल तर मोठ्या मनाने माफ करा बाबा ! 🙏😊❤️ हिरा जसा अनमोल आहे तसे माझ्यासाठी तुम्ही आहात...असेच आनंदी रहा... आमच्या आयुष्यात हिऱ्यासारखे तेज तुमच्या मुळे येऊ द्या हीच आई जगदंबेला प्रार्थना करते... परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग दंडवत 💐🙏❤️🎉
No comments:
Post a Comment