माझं पहिलं बाळ आज 9 वर्ष पूर्ण होऊन 10 व्या वर्षात पदार्पण करत आहे... प्रत्येक आईला सर्व मुले सारखीच असतात पण पहिल्या बाळाच्या सर्व आठवणीचा जणू खजिना असतो... कारण तिला आईपण हा अनुभव पहिलाच असतो त्यामुळे खूप कुतूहल असते बाळाची चाहूल लागल्यापासून प्रत्येक क्षण ती 9 महीने खूप आनंदात जगते... त्या बाळाच्या सर्व हालचाली सुरू झाल्या की फार आनंद वाटतो.. त्याला गप्पा मारत ती आई ते क्षण enjoy करत असते.. तिचा पहिला अनुभव असल्याने थोडा काही बदल जाणवला की घाबरून जाते कारण बाळ हे तिचा श्वास बनलेले असते... त्याला काहीच होऊ देऊ नये म्हणून प्रत्येक काम जपून करते...भले ती आधी ती फार वेंधळी असेल पण आई होणार कळताच तिच्यात समजूतदारपणा आपोआप येतोच..तसेच काहीसे माझे झाले होते.. मी आधी मुलगी होते ..मग बायको झाले ..मग dr. Ni सांगितले तुम्ही आई होणार आहात मग काय खुप छान वाटले पण आत एक अनामिक भीती होती ही जबाबदारी व्यवस्थित मी पार पाडेल की नाही ?? पण दिवसानी दिवस जात होते बाळ मोठे होत होते..त्यात एक दिवस अचानक पोटात किक मारली त्याने..मला तो क्षण आज पण लक्षात आहे खूप भारी वाटले होते... आपलं बाळ आपल्या कुशीत आहे हे feeling किती अद्भुत असते हे कुठलीच आई अशी शब्दात नाही सांगू शकणार... नंतर बघता बघता 9 महीने पूर्ण झाले.. 1 जुलै ला माझे बाळ आले..या जगाची ओळख करून घेतली त्याने.. पण गम्मत ही झाली डिलिव्हरी झाली बाळाला बाहेर घेऊन गेले पण मला 2 तासांनी मी विचारले अरे सांगा की मुलगी की मुलगा झाला... जो तो नुसते अभिनंदन करतोय पण मला सांगितलेच नाही... असो..मग हळू हळू त्याला कसं घ्यायच हे पण 1st time होतं ना ..एवढे छोटे बाळ कुणाचे घेतलेच नव्हते ..त्याचे एवढेसे हात - पाय ! खूप गोड दिसत होते..त्याचे हसणे..रडण्याचा आवाज मग मी काय करू अन काय नाही.. कारण बाळ का रडते हे पण नेमकं कळत नव्हते.. पण माझे आई वडील यांनी खूप सांभाळले त्याला..असेच दिवस निघून गेले मग त्याचे बोबडे बोलणे..पहिले पाऊल टाकले तो क्षण..त्याने जेव्हा मला " मां " म्हणले... खूप खूप आठवणी आहेत...त्याचे बाबा त्यांनी पण तेवढीच साथ मला दिली त्याला वाढवताना खूप अडचणी..आजारपण आले पण त्यांनी त्यांच्या जबाबदारी मध्ये कमी येऊ दिली नाही.. त्याचे सर्व हट्ट पुरवले..त्याला आई सारखीच माया लावली...सद्गुरुंची कृपा म्हणून माझ्या सद्गुरुंनी कमलेश नाव ठेवले... आज कमलेश 9 वर्षांचा झाला आहे पण समजूतदारपणा हा एक 16 वर्षाच्या मुलाला असतो तेवढा आहे.. माझ्यावर देवाची आणि माझ्या सद्गुरुंची कृपा आहे की एवढा परिपूर्ण मुलगा आणि सद्गुणी मुलगा माझ्या पोटी जन्माला आला...माझ्या प्रत्येक संकटात कमलेश माझी साथ देतो खूप जीव लावतो..त्याला माझ्या चेहर्यावरचे हावभाव बघून समजते की मला काय झाले ते..माझे सासरे आज नाहियेत पण त्यांना आज खूप अभिमान वाटला असता कमलेश ला बघून.. त्याची आज्जी,काका, काकू,आत्या हे पण खूप लाड पुरवितात...सर्वांच्या लाडाने पण त्याला ही जाणीव आहे की आपण काहीही चुकीचे वागू तर त्रास आपल्या माँ ला होणार त्यामुळे तो काहीही गैर वागत नाही.माझं दुसर्या बाळाला म्हणजेच अखिलेश वर फार जीव आहे कमलेशचा... या पुढील काळात पण देवाने अशीच बुद्धि आणि त्याला भरभरून आशीर्वाद द्यावे.. त्याला कधीच कुठल्याच गोष्टींची कमी पडू नये.. किती जरी मोठा झाला तरी गर्व येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते... माझ्या बाळाला खूप सुखी ठेव..कृपा असू देत.. कमलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद... खूप मोठा हो..दीर्घायुषी हो..आरोग्य संपन्न हो हाच एक आई तुला आशिर्वाद देते... !
No comments:
Post a Comment